“बजाव घंटा, होऊदे तंटा- अर्थात देवेंद्र फडणवीस वर्सेस उद्धव ठाकरे”

सध्या महाराष्ट्रात (uddhav thackeray)  @CM_ उद्धव_ठाकरे सरकार विरोधात राळ उडवण्याची जणू सगळ्यांचं घाई झालेली दिसतेय. त्यातल्या त्यात (devendra fadnavis vs uddhav thackeray) देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. याला तिखटजाळ फोडणी म्हणून (amruta fadnavis) मिसेस अमृता फडणवीस मध्ये-मध्ये वादग्रस्त विधानातून काम करत असतात. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी थोडी जरी सबुरी दाखवली असती तर आज ठाकरे सरकार विरोधात घंटा वाजवण्याची वेळच “भाजपावर” परिणामी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली नसती.


ताणल्याने तुटतं हेच सूत्र देवेंद्र फडणवीस विसरल्यानेच, त्यांच्यावर रणशंख फुंकण्याची वेळ आली आहे. आज संपूर्ण जग कोरोना या महामारीच्या विळख्यात सापडलं असताना सरकारला पर्यायी जनतेला सहकार्य करायचं सोडून, यांनी त्यालाच आपलं हत्यार बनवलं आहे. ज्यावेळस शस्त्रांच्या सहाय्याने शत्रूचा पराभव होत नाही. तेंव्हा कुटील राजकारण करावं. हेच तंत्र आज महाराष्ट्रातील भाजपावाले वापरत आहेत. बाप हार जात नसेल तर मुलाला निशाणा बनावा. त्याला वाचवण्यासाठी बाप नक्कीच शरण येईल. म्हणून त्यांनी @पर्यटनमंत्री_आदित्य_ठाकरेंना बळीचा बकरा बनवण्याचं ठरवलं. आणि दिशा पटणीलाच रिया चक्रवर्ती म्हणून दाखवण्यात संबोधण्यात येऊ लागलं. त्यातही आदित्या ठाकरेंनी आपलं सज्जनपणा दाखवत एक पत्रक काढलंच. ज्यात लिहिलं होतं “ठाकरे कुटुंबियांच्या नावाला बट्टा लागेल असं कोणतंही कृत्य माझ्याकडून घडलं नाही आणि घडणारही नाही.” येव्हढ्यावरही हार जाईल ते अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस कसले. बिहारला जाता जाता त्याने आपल्या सहका-यांना सरकारला हादरून टाकण्यासाठी ‘बजाव घंटा, होऊदे तंटा’चा कानमंत्र दिला.

सोनिया गांधीच्या विडीओ कॉन्फरन्सचालू असताना, उद्धवसाहेबांनी आपली ओळख करून दिली, “मी लढणा-या बापाचा मुलगा आहे, हार मनानं आमच्या रक्तात नाही”. खरंच या वाक्याला ते जागले, सरकार विरोधात, आपल्या मुलाच्या विरोधात देखील चिखलफेक झाली असताना त्यांनी प्राथमिकता महाराष्ट्र जनतेला दिलं. त्यामुळे भलेही विरोधक त्यांच्या विरोधात असतील पण जनता मात्र त्यांच्या मागे सह्याद्री सारखी अभेद उभी आहे. नाहीतर तीन चाकी रिक्षाने विमानाच्या गतीने चालवणं कधीही शक्य झालं नसतं.

महाराष्ट्राचा इतिहास साक्षी आहे, आतापर्यंत झालेल्या बहुतेक सर्व मुख्यमंत्र्यांनी आपल्या वडीलांचं नाव काढलं पण उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या बापाचं नाव राखलं, “उद्धव बाळासाहेब ठाकरे – सौ सोनार की तो एक लोहार की!”

“बजाव घंटा, होऊदे तंटा- अर्थात देवेंद्र फडणवीस वर्सेस उद्धव ठाकरे” शेवटी दोन जिवलग मित्रचं एकमेकांचे कट्टर शत्रू ठरू शकतात हे आज संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतो आहे.

भानुदास तान्हाजी पानमंद

Post a Comment

0 Comments