Latest Sarees 2020: बाजारात कोणत्या साड्यांची आहे चलती? वाचा एका क्लिकवर



लॉकडाऊनच्या काळात शॉपिंगला ब्रेक लागला होता. मात्र, आता ऑफलाईन शॉपिंगसोबतच ऑनलाईन शॉपिंगला परवानगी देण्यात आल्याने अनेकांकडून शॉपिंग सुरू झाली आहे. त्यातच, येत्या पुढच्या काळात अनेक सणवार असल्याने महिलांकडून साड्या खरेदीकडे (Latest saree collection 2020)कल वाढला आहे. बाजारात एक लक्ष टाकल्यास विविध पद्धतीचे डिझायनर साड्या (Designer sarees in 2020) सहज दिसतात. अशाच काही लेटेस्ट डिजायनिंग साड्या आपण पाहुयात. (Latest and Designer sarees in 2020)


कॉटन सिल्क साडी (Cotton silk saree)



गेल्या काही वर्षांत Cotton silk saree महिलांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नेसायला आणि वावरायला अत्यंत सहज असल्याने कॉटन साड्यांची मागणी वाढली आहे. Cotton silk saree हा प्रकार जरा ऐकायला नवल वाटत असलं तरीही बाजारात या साडी प्रकाराला प्रचंड मागणी आहे.

पॉली कॉटन प्रिंटेट ऑफिस वेअर साडी (Polly cotton printed office wear saree)



सध्या कोर्पोरेट लुकसाठीही अनेक तरुणी आणि महिला साडी परिधान करतात. दिसायला अत्यंत साधी, सरळ पण तितकीच आकर्षक असलेली Polly cotton printed office wear sareeची सध्या बाजारात चलती आहे. 


जॅक्वार्ट नेट साडी (Jacquard Net Saree)



नेहमीपेक्षा काहीतरी हटके ट्राय करायचं असेल तर Jacquard Net Saree तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. नेटवर आर्ट वर्क केलेल्या साड्या महिलांना फार आकर्षित करत आहेत. त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन बाजारातही या साड्यांना प्रचंड मागणी दिसत आहे.


सिफॉन साडी (Chiffon saree)



सिल्क साड्यांमध्ये डिझायन केलेल्या Chiffon saree  महिलांना आकर्षित करत आहेत. नेसायला अत्यंत सोप्या असलेल्या या साड्या कॉर्पोरेट लुकसाठी अत्यंत परफेक्ट आहेत. त्यामुळे एखाद्या समारंभात तसेच, ऑफिस वेअरसाठी तुम्ही चांगला पर्याय शोधत असाल तर हा पर्याय सर्वात उत्तम आहेत. 

Post a Comment

0 Comments