navratri chaniya choli for women latest 2020 : भारत हा सणांचा देशा आहे. हे आज जगभरातील सर्वांच्याच लक्षात आलंय. आपल्याकडे प्रत्येक सण माणसातल्या माणुसकीला आणि विचार प्रवृत्तीला व्यक्त करण्यासाठी निर्माण झाला आहे. भाद्रपदातील गणपती उत्सव संपताच आपल्या वेध लागतं ते पितृपक्षा नंतर येणा-या नवरात्रीच.
पौराणिक कथांमध्ये नवरात्री बद्दल दोन आख्यायिका जगप्रसिद्ध आहेत. एक प्रभू रामचंद्रांचा प्रगाड पंडित रावणावर मिळवलेला विजय आणि दोन माता दुर्गेच्या रुपात महिषासुरावर मिळवलेला विजय. या दोन्ही युद्धांचा कालावधी दहा दिवसांचा असल्याने, नवरात्र म्हणजे नऊ रात्र चाललेलं युद्ध आणि दहाव्या दिवशी मिळवलेला विजय. म्हणूनच ‘विजयादशमी’ अर्थात दस-या “सत्याचा असत्यावर” “चांगल्याचा वाईटावर” विजय मिळवण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये हा सलग १० दिवस चालणारा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. भारतामध्ये वेगेवेगळ्या भागात नवरात्र हा सण विविधतेने साजरा केला जात असला तरीही, आज हा गुजरातच्या संस्कृतीची ओळख करून देणा-या ‘गरबा’ या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.
akhand deep : नवरात्रीतील अखंड दीप
जगभरतील हिंदू या नऊ दिवसात स्त्री तत्वाची पूजा करतात. तसेच त्या तत्वातील विविध पैलूंच्या सन्मानार्थ या नऊ दिवसात धार्मिक विधी पार पाडल्या जातात. यातील महत्त्वपूर्ण विधी म्हणजे कन्या पूजा. या विधीमध्ये नवतरुणींना मानाचं स्थान असल्याने त्यांची देवीच्या रुपात पूजा केली जाते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ‘गरबा’ पारंपारिक नृत्यप्रकार सामुहिक प्रकरात साजरा केला जातो.
गरबा या नृत्यामध्ये राजस्थानी व गुजराती चनिया-चोली या पारंपारिक वस्त्रांचं सर्व वयातील महिलांमध्ये विशेष आकर्षण आहे. त्यामुळे बहुतांशी महिला वर्ग या नऊ दिवसांसाठी वेगेवेगळ्या स्वरूपातील विविधतेने नटलेली ‘navratri chaniya choli’ आणि त्यावरील आकर्षण दिसणारे दागिने घालण्याला प्राधान्य देतात. याचाच विचार करून navratri chaniya choli for women latest design आपल्याला ऑनलायीन शॉपिंगमध्ये विशेष स्वरूपात पहायला मिळतात.
आजचा युग हे डिजिटलचं असल्याने कोणतीही गोष्ट प्रत्यक्ष दुकानात जाऊन विकत घेण्या अगोदर ती आपल्या मोबाइल, लॅपटॉप, कॉम्पुटरच्या माध्यमातून इंटरनेटवर शोध घेतला जातो.
उदा.
- navratri chaniya choli for women latest 2020,
- navratri chaniya choli for women rajsthani,
- navratri black chaniya choli for women वगैरे वगैरे.
सर्व मंगल मांगल्यै, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्यै त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।
navratri chaniya choli : नवरात्री गरबा आणि चनिया चोली निमित्त या वर्षीचे दिवसांसाठीचे नऊ रंग आणि देवींची नऊ नावे
akhand deep : नवरात्रीतील अखंड दीप
navratri chaniya choli : नवरात्री गरबा आणि चनिया चोली ही माहिती आपल्या कशी वाटली ती जरूर कळवा...
टीम : मराठीट्रेलर
0 Comments