akhand deep : नवरात्रीतील अखंड दीप

 akhand deep : नवरात्रीतील अखंड दीप :

नवरात्र मग ती चित्रातील असो वा अश्विनातील. हिंदू धर्मात दोन्हीही नवरात्रींना अनन्य महत्त्व आहे. त्यातल्या त्यात अश्विन नवरात्र म्हणजेच शारदीय नवरात्रीला अखंड दीप akhand deep याला विशेष महत्त्व आहे. या नवरात्रात जेंव्हा घटस्थापना होते तेंव्हा त्या ठिकाणी हा नंदादीप (akhand deep) लावला जातो, अखंड तेवत ठेवला जातो मम्हणूनच याला अखंड दीप akhand deep म्हटलं जातं. अखंड म्हणजे ज्यात कधीही खंड पडू दिला जात नाही तो दिवा. 

akhand deep, Navratri festival in Marathi, Navratri festival information in English, Navratri festival information in Marathi language, what is Navratri celebrated

हा दिवा शक्यतो शुद्ध धातूंपासून बनवलेल्या वस्तूंमध्ये लावला जातो. म्हणून पितळ किंवा माती पासून बनवलेल्या दिव्यांमध्ये अखंड ज्योती पेटवली जाते. घटाच्या बाजूला दोन दिवे पेटवले जातात एक शुद्ध तुपाचा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा असावा. या दिव्याचे ज्वलन करण्यापूर्वी 

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।।” 

या मंत्राचं उचारण करताना गणेश, दुर्गामाता आणि शिवशंकर यांचं स्मरण करूनच या दिव्यांना प्रज्वलित करावं. 

navratri chaniya choli : नवरात्री गरबा आणि चनिया चोली

akhand deep लावण्याचे काही नियम आहेत.

akhand deep कधीही जमिनीवर ठेऊ नये. या नंदादीपाखाली हळद-कुंकू किंवा गुलाल मिश्रित तांदुळापासून अष्टदल बनवावं. त्यानंतर त्यावर हा नंदादीप ठेवावा. akhand deep लावताना कधीही तेलाच्या दिव्याने तुपाच्या दिव्याची वात प्रज्वलित करू नये. akhand deep in Navratri लावताना देवीच्या अथवा घटाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा व डाव्या बाजूला तेलाचा दीप लावावा.

akhand deep कुणी लावावेत

akhand deep लावणे हा धार्मिक विधी असल्याने, जे कुणी हिंदू धर्म आणि परंपरा यावर विश्वास ठेवतात त्या प्रत्येकाने हा नंदादीप लावावाच. असं म्हणतात की विद्यार्थ्यांना यश मिळवायचं असेल तर कठोर मेहनती बरोबर ईश्वरी कृपाही असावी लागते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी देखील हा akhand deep प्रज्वलित करावा. तर वास्तुदोषाने त्रस्त असणा-यांनी तिळाचा akhand deep प्रज्वलित करावा. तसेच शनीच्या अवकृपा असणा-यांनी त्यातून मुक्त होण्यासाठी तीळ किंव्हा मोहरीच्या तेलाची अखंड दीप लावणे शुभ मानलं जातं.

लक्षात ठेवा akhand deep हा नंदादीप लावणे आणि तो विझू देऊ नये याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. त्यासाठी मध्ये-मध्ये या दिव्याच्या पात्रात तूप अथवा तेल घालवे व वातीवर लक्ष ठेवून वेळ प्रसंगी दुसरी वाती त्यावरच लावावी.

navratri chaniya choli : नवरात्री गरबा आणि चनिया चोली

akhand deep अर्थात नंदादीपाची माहिती कशी वाटली आम्हांला कळवा...!!

टीम : मराठीट्रेलर

Post a Comment

0 Comments