५ सप्टेंबर शिक्षक दिन अर्थात #TeachersDay

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकाला अर्थात गुरूला आई नंतरचा आणि वडिलांच्या आधीचा दर्जा दिला आहे. खरंच आपल्या जीवनात गुरु येव्हढं महत्त्व ठेवतो का?

शिक्षक दिन कविता, शिक्षक दिन भाषण, शिक्षक दिन बातमी लेखन मराठी,  ,शिक्षक दिनाची बातमी तयार करा, शिक्षक दिन पर वृत्तांत लेखन, शिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी,  शिक्षक दिन बातमी लेखन,  शिक्षक दिनाचे भाषण,  शिक्षक दिन निबंध,  शिक्षक दिन सूत्रसंचालन, होय... गुरु म्हणजे जीवनाचा मार्ग दाखवणारा खरा दिशादर्शक असतो. आपल्याला पाहण्याची दृष्टी जन्मातच मिळालेली असते पण जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्याला गुरु दाखवत असतो. देवाचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाला गुरूची आवश्यकताच पडली नसती, तर त्यांनी सांदिपनी ऋषींच्या आश्रमात आपला शिक्षण काल काढलाच नसता. पण दृष्टीकोन शिकतो तो गुरु. त्याच ठिकाणी त्यांनी बंधू बलराम आणि सखा सुदामा यांच्या सोबत १५ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती ठरल्याने त्यांना जगातला पहिला विश्व गुरु देखील मानलं गेलं आहे. 
 
शिक्षक दिन कविता, शिक्षक दिन भाषण, शिक्षक दिन बातमी लेखन मराठी,  ,शिक्षक दिनाची बातमी तयार करा, शिक्षक दिन पर वृत्तांत लेखन, शिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी,  शिक्षक दिन बातमी लेखन,  शिक्षक दिनाचे भाषण,  शिक्षक दिन निबंध,  शिक्षक दिन सूत्रसंचालन,

 

हे झालं पुरणाचा दाखला परंतु आजच्या या टेक्नोलॉजीच्या जगात देखील आपल्याला शिक्षकांची आवश्यकता भासते. त्यामुळेच पुराणातली गुरु पौर्णिमा आणि आजचा शिक्षक दिन हा विध्यार्थ्यांच्या जीवनात विशेष महत्त्वाचा ठरतो. जो शिकवतो त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे आपण विद्यार्थी दशेतील त्या प्रत्येक शिक्षकाला आपण वंदन करत असतो ज्याने आपल्याला काहीतरी शिकवलं आहे.

15 Excellent Teacher’s Day Gift Ideas For Students- शिक्षक दिनाच्या उत्कृष्ट १५ भेटवस्तू

 

शिक्षक दिन

भारतात शिक्षक दिन हा ५ सप्टेंबरला साजरा करण्याची परंपरा पडली ती भा

रताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिनावरुनच. स्वतंत्र्य भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवताना त्यांनी त्यांच्यातील शिक्षकाला कधीही विसर पडू दिला नाही. हाच पायंडा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देखील तंतोतंत पाळला. साधी राहणी उच्च विचार हेच मुख्य लक्षण एका शिक्षकाचं असतं.

शिक्षक दिनाची सुरवात

एका व्यक्तीतील व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचा फार मोठा वाटा असतो. जसा शिक्षक तसा शिष्य. “गुरुविण न मिळे ज्ञान । ज्ञाना विना न होई जगी सन्मान।।” याचाच आदर्श घेत आज जगाभारात शिक्षक दिनाची सुरवात शतकात झाली असली तरी भारतात मात्र सर्वात आधी १९६२ला सुरवात झाली.जसा आपल्याकडे ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तसाच तो इतर काही देशात पाच ऑक्टोबरला साजरा केला जातो. ज्या प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात यांचा समावेश होतो.    

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी थोडक्यात?   

आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी ५ सप्टेंबर १८८८ ला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. शिक्षण क्षेत्राला त्यांनी आपलं सर्वस्व मानल्याने, तिथे त्यांचं एक वेगळंच वलय निर्माण झालं. आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठचे कुलगुरू पद भूषवले तर १९३१ ते १९३९ संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये रशियात भारताचा राजदूत म्हणून नियुक्ती. १९५२ ते १९६२ या कालावधीमध्ये देशाचे उपराष्ट्रपतीपद, १४ मे १९६२ रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले. तर १९५४ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताबही बहाल केला होता. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा नामांकन मिळाले होते. त्यांच्या याच योगदानाबद्दल सरकारने त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्यातील शिक्षकाला मानवंदना म्हणून त्यांचाच जन्मदिवस हा शिक्षक दिन साजरा करायला सुरवात केली. वयाच्या ८७ व्या वर्षी १७ एप्रिल १९७५ रोजी त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.   

शिक्षक दिन सूत्रसंचालन Shikshak Din Sutrsanchalan

शिक्षक दिन कविता, शिक्षक दिन भाषण, शिक्षक दिन बातमी लेखन मराठी,  ,शिक्षक दिनाची बातमी तयार करा, शिक्षक दिन पर वृत्तांत लेखन, शिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी,  शिक्षक दिन निबंध,  शिक्षक दिन सूत्रसंचालन,भारतातील बहुतेक सर्वच शाळांमध्ये ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी मोठ्या वर्गातील मुलं शिक्षक बनून लहान वर्गांना शिकवण्यात आपल्या गुरूचं अनुकरण करताना दिसतात. यातूनच उद्याच्या शिक्षकाची बीजेही रोवली जातात. माणूस म्हणून आई-वडिलांनंतर आपल्याला घडविण्यात सर्वात मोठा वाटा हा शिक्षकांचाच असतो. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया| त्यांच्याच कृतज्ञेतुन उतराई होण्यासाठी आजचा हा शिक्षक दिन.  

15 Excellent Teacher’s Day Gift Ideas For Students- शिक्षक दिनाच्या उत्कृष्ट १५ भेटवस्तू

 

भानुदास तान्हाजी पानमंद



Tags :
शिShikshak Din कविता, Shikshak Din भाषण, शिक्षक दिन बातमी लेखन मराठी, ,शिक्षक दिनाची बातमी तयार करा, शिक्षक दिन पर वृत्तांत लेखन, शिक्षक दिन वृत्तांत लेखन मराठी, Shikshak Din Batami Lekhan, शिक्षक दिनाचे भाषण, शिक्षक दिन निबंध, शिक्षक दिन सूत्रसंचालन

Post a Comment

0 Comments