Durga Mahishasura Mardini : नवरात्र म्हणजे महिषासुराच्या विनाशासाठी दुर्गेने अविरत केलेलं युद्ध. नवव्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला म्हणूनच तिला महिषासुर मर्दिनी देखील म्हणतात. “माझा वध फक्त एक स्त्रीच करू शकते... अन्यथा कुणीही नाही” असा वर मिळवलेल्या, फक्त महिषासुराचा वध याच हेतूने त्रीमुत्रीने आपल्या तेजस रसातून निर्माण केलेल्या दुर्गेला युद्धानंतर तिन्ही देवांनी आपली कन्या म्हणून पूजन केले. कन्या म्हणजेच दूर्गेचं रूप असल्याचं चित्तात ठेवूनच, शारदीय नवरात्रामध्ये कन्यापूजनाला विशेष प्राप्त झाले आहे. कुमारिका म्हणजे दोन वर्षांपासून दहा वर्ष्यांच्या असणा-या मुली. त्यांनाच साक्षात देवीचे रूप मानून जमेल त्या दिवशी अथवा अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करणे सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे.
best gift for kanya pujan : नवरात्रीसारख्या दिव्य उत्सवात आपण आपल्या कुटुंबातील, मित्र परिवारातील वा नातेवाईकांमधून आणलेल्या या कुमारिकांना पूजनासाठी आमंत्रित करत असतो. तेंव्हा त्या परिवाराशी आपले नाते दृढ करण्यासाठी कन्या पूजना निमत्त विशेष उपहार म्हणून काही भेटवस्तू दिल्या जातात. तेव्हा आपण या वर्षाच्या नवरात्र कन्या पूजनाला दुर्गादेवीच्या या छोट्या अवतारांना kanya puja gifts म्हणून काही अद्वितीय भेट देऊ शकता.
akhand deep : नवरात्रीतील अखंड दीप
9 Navratri special gift for kanya pujan : कन्या पूजनासाठी नवरात्रामधील ९ विशेष उपहार
1. Goddess Durga Idol : दुर्गा देवीची मूर्ती
एका विशिष्ट दधातु बनलेली दुर्गा देवीची मूर्ती, नवरात्रीतील तिच्या आशीर्वादाने भरलेली एक सर्वोत्तम भेट आहे. ज्या घरात ही भेटरुपी मूर्ती जाईल तिथे योग्य स्थापना करून पूजा केला जाईल. जेणेकरून त्यांच्या घरात एक विलक्षण सकारात्मक उर्जेचा वास होईल.
2. Handmade Beautiful Diyas : हाताने बनवलेले सुंदर दिवे
दिवा हा भारतीय संस्कृतीत उपासनेतील अटळ भाग आहे. पूजेच्या वेळी दिवा/दीप लावणे म्हणजे घरातील अंधकार आणि नकारात्मक उर्जेचा नाश होणे. तेंव्हा हे सुबक दिव्यांचा सेट नवरात्रीसाठी एक उत्तम भेट आहे.
3. Box of Dry Fruits : सुख्या मेव्यांचा बॉक्स
एक निरोगी आरोग्यासाठी भेट! काजू, बदाम, बडीशेप, सुपारी, मनुका, अक्रोड आणि इतर सर्व सुख्या मेव्यांचा हा बॉक्स गिफ्ट करण्याचा करणे हा उत्तम विचार आहे. नवरात्रातील नऊ दिवस उपवास ठेवणा-यांसाठी हा सुख्या मेव्यांचा बॉक्स हा आरोग्यदायी उत्तम नवरात्र भेट आहे.
4. Set of Flavoured Incense Sticks : सुवासिक धूप कांड्या सेट
वेगवेगळ्या सुगंधी प्रकारातील धूप कांड्या देण्याबद्दल कुणी कधीही विचार केला नसेल. ती भेट म्हणून आपम या छोट्या नऊ दुर्वाना देऊ शकतो. नवरात्रात या अनोख्या नवरात्रातील भेटवस्तू दिल्याने, नवरात्रोत्सवाप्रमाणेच या धूप कांड्या त्यांच्या जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढवतील असा अशा करूयात.
5. Tiara : धातूचा मुकुट
प्रत्येक मुलीला नटण्या मुरडण्याची भारी हौस असते. अशा वेळी आपण जर त्यांना धातूपासून बनवलेला, सुंदर आणि आकर्षक फुलांनी सजवलेला मुकुट भेट दिला तर. ख-या अर्थाने त्या मुलांच्या चेह-यावर हासू उमटेल.
6. Pure Indian Sweets : शुद्ध भारतीय मिठाई
कोणताही भारतीय सण मिठाईविना अधुराच आहेत !!! नवरात्रोत्सवासाठी बनवलेल्या काही शुद्ध तुपातील पारंपारिक मिठाई, आपण भेट म्हणून देऊ शकतो. जर अशे विविध मिठाईने भरलेला बॉक्स भेट तर ती ही गोडपणाची अमूल्य भेट ठरेल.
navratri chaniya choli : नवरात्री गरबा आणि चनिया चोली
7. Stationery items: स्टेशनरीतील वस्तू
आज शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. “मुलगी शिकली प्रगती झाली” आपल्या शासनाचे हे ब्रीद असल्याने, आपण देखील या मुलींना शिक्षणात गोडी निर्माण होण्यासाठी स्टेशनरीच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकतो. या त्यांना best gift for girls ठरू शकतील
8. Toys and games: खेळणी आणि गेम्स
मुलींना लहानपणा पासून बैठ्या खेळाची नेहमीच आवड असते. तिची आवड लक्षात घेऊनच आपण त्यांना त्यांच्या आवडीची खेळणी अथवा काही गेम्स भेटस्वरूप देऊ शकतो.
9. Ganesha Incense Burner : गणेश उदबत्ती स्टँड
गणेश उदबत्ती स्टँड : एक सुखदायक पूजा साहित्य. ही दुहेरी भेट वस्तू ठरू शकते. जशी या उदबत्ती स्टँड मध्ये, गणेशाची एक लहान मूर्ती असून तिला कलात्मक दृष्ट्या डिझाइन केले आहे. शिवाय बाजूलाच धूप लावण्याचा शंकूच्या देखील जोडलेला आहे. कोणत्याही पूजेमध्ये प्रथम गणेशाचीच पूजा केली जाते. गणेश उदबत्ती स्टँडचे देखणेपण, डिझाइन आणि अध्यात्मिक मूल्यामुळेच ही कन्यकांना देण्यात येणारी best gift for kanya pujan मानली जाऊ शकते.
best navratri gifts : या आहेत शारदीय नवरात्रात कन्या पूजनाच्यावेळी कन्यकांना भेट देण्यात येणा-या विशेष 9 भेटवस्तू.
akhand deep : नवरात्रीतील अखंड दीप
navratri chaniya choli : नवरात्री गरबा आणि चनिया चोली
फक्त महिलांसाठी नवरात्रातील माता दुर्गापूजनाचे नऊ मंत्र. नवरात्रीच्या अमूल्य भेटीबरोबर तुम्ही हे मंत्र देखील पाठवू शकता
- ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥
- ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः॥
- ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः॥
- ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥
- ॐ देवी स्कन्दमातायै नमः॥
- ॐ देवी कात्यायन्यै नमः॥
- ॐ देवी कालरात्र्यै नमः॥
- ॐ देवी महागौर्यै नमः॥
- ॐ देवी सिद्धिदात्र्यै नमः॥
Durga Mata aarti : दुर्गा मातेची आरती
नवरात्रीच्या आपणांस मन:पूर्वक शुभेच्छा!!
#घरी_रहा_सुरक्षित_रहा
टीम :मराठीट्रेलर.कॉम
0 Comments