Durga Mata aarti : दुर्गा मातेची आरती
Durga Mata aarti : आरती म्हणजेच देव-देवतांचं केलेलं स्तुती कवन. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक देव-देवता वास करत आहेत. त्यांची सगळ्यांची महिमा वेगवेगळा असला तरी, त्या सर्व देव-देवतांचा उद्धेश एकच असतो. आपल्या भक्तांची त्यांच्या त्रासातून, त्यांच्या अडचणीतून सुटका करणे.
तर काही ठिकाणी फक्त देव-देवतांच्या नावाचा महिमा वर्णिला जातो. त्यांची स्तुती कवने सामुदायिक स्वरूपात गायली जातात. त्यासाठी प्रत्येक देवताचा विशिष्ट वेळ ठरलेली आहे.
त्याच नुसार गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी, गणपती उत्सव. तर आश्विन शुद्ध प्रतीपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत दुर्गा देवीची उपासना केली जाते. त्याच उपासनेच्या दरम्यान Durga Mata देवीचा महिमा वर्णन करण्यासाठी जे स्तुती कवन गायले जाते त्यालाच देवीची आरती म्हणतात.
हिंदी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आरती गायल्या जातात.परंतु मराठी ही एकमेव आरती सामूहिक स्वरुपात गायली जाते. ज्यात देवीचा महिमा आहे, तिने केलेलं अद्वितीय कार्य आहे आणि भक्ताची कामना देखील आहे.
दुर्गा माता आरती : Durga Mata aarti
॥ श्री दुर्गा देवीची आरती ॥
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥
त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही।
चारी श्रमले परन्तु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।
क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा।
अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा।
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥
Durga Mata : जोगवा
जोगवा मागणे देवीच्या उपासनेतील प्रकार आहे. काही लोकं याला देवीचा कुलधर्म म्हणून जोगवा मागतात. यालाच अनुसरून संत शिरोमणी एकनाथ महाराजांनी यावर एक भारूड रचले आहे. ते असे-
अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥
त्रिविध तापांची कराया झाडणी ।
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥
आईचा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥
हाती बोधाचा झेंडा घेईन ।
भेदरहित वारिसी जाईन ॥
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा ।
करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा ॥
या भारुडात जोगव्याचे स्वरूप आणि हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त केला आहे.
देवी आपल्या जीवनात समृद्धी, निरोगी आरोग्य आणि आनंदाचा वर्षाव करो! नवरात्रीच्या आपणांस मन:पूर्वक शुभेच्छा!!
#घरी_रहा_सुरक्षित_रहा
टीम :मराठीट्रेलर.कॉम
0 Comments